खोपोली | वार्ताहर |
खालापूर नगरपंचायतीच्या प्रभाग 2 मधून शेकाप नेते संतोष जंगम,शिवानी जंगम यांनी सोमवारी (दि.3 जानेवारी) उमेदवारी अर्ज सादर केला. हा प्रभाग यापूर्वी ओबीसींसाठी राखीव होता.पण न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी प्रवर्ग आता खुल्या प्रवर्गातून निवडला जाणार आहे त्यासाठी आता 18 जानेवारीला मतदान होत आहे.
सोमवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शेकाप – 2,शिवसेना – 2 व अपक्ष – 2 अशा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत.शिवसेनेकडून मारूती अनंत पवार व भोसले मंदा मनोहर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर अपक्ष म्हणून पवार मारूती अनंत आणि पेडणेकर दिपाली सुधीर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.






