खालापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीला रंगत येणार

। खालापूर । गुरुनाथ साठेलकर ।
खालापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीला शेकाप स्वबळावर निवडणुकीला सामोरा जातोय. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार ज्या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत तेथील शिवसेनेच्या चार उमेदवारांनी माघार घेतली आहे. यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युती झाल्याची स्पष्ट झाले आहे.मनसे आणि भाजपने मोजक्याच ठिकाणी आपापल्या उमेदवारांच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यामुळे एक प्रभागात निवडणुकीचा अद्यापही कोणता निर्णय झाला नाही, तर सोळा जागी निवडणूक अर्ज मागे घेण्याची सोमवारी मुदत संपली.
माजी नगराध्यक्ष शिवानी जंगम यांनी या निवडणुकीत आपला अर्ज मागे घेऊन नव्या उमेदवारांना संधी देण्याचा संकल्प केलेला आहे. 17 पैकी 16 जागी आता निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्याकडे प्रवास करत असून यामध्ये संतोष जंगम यांनी देखील माघार घेतली आहे. या निवडणुकीत संतोष जंगम आणि शिवानी जंगम हे दोन्ही उमेदवार किंगमेकर च्या भूमिकेत असून शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ते कंबर कसणार आहेत. यंदाची निवडणूक ही मागच्या निवडणुकीपेक्षा काहीशी वेगळी असल्याने आपला पूर्ण वेळ इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी देता यावा म्हणून त्यांनी माघार घेतली असावी असे बोलले जात आहे.
रायगड जिल्ह्यात अत्यंत महत्त्वाची समजली जाणार्‍या खालापूर नगरपंचायतीत शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती. नगराध्यक्ष पदाची सुरुवातीच्या अडीच वर्षाची महत्त्वाची जबाबदारी शिवानी जंगम यांनी मोठ्या हिमतीने उचलली आणि सक्षमपणे कारभार करून विकासाची गंगा खालापुरात आणली होती. त्याच बळावर उर्वरित अडीच वर्षात इतर नगराध्यक्षांनीही सक्षम कारभार केला होता. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास खात्याकडून येणार्‍या निधीची वाट न पाहता विविध माध्यमातून खालापूर नगर पंचायतीचा विकास करण्याचा विडा जंगम उभयतांनी उचलला होता आणि त्यात ते यशस्वी देखील झाले. आता होऊ घातलेल्या निवडणुकीत जंगम उभयता उमेदवारी घेऊन मतदारांच्या समोर जाणार असल्याच्या चर्चा असताना त्या दोघांनीही घेतलेली माघार पाहून राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ओबीसीच्या मुद्द्यावरून आरक्षित असलेल्या प्रभागात संतोष जंगम यांनी आपली उमेदवारी ठेवलेली आहे त्यामुळे उर्वरित 16 सोळा प्रभागात होणार्‍या निवडणुकीत जंगम उभयतांनी जरी माघार घेतली असली तर हुकमाचा एक्का ठरावी असा ओबीसी आरक्षित जागेवरची संतोष जंगम यांची उमेदवारी असेल सांगण्यास कोणा ज्योतिषाची गरज नाही.


पुन्हा लालबावटाच फडकणार
खालापुरातील मतदार हे सुज्ञ आहेत शेतकरी कामगार पक्षाच्या विकासात्मक भूमिकेला ते जाणतात त्यामुळे आपण स्वतः किंवा शिवानी जंगम त्या ठिकाणी उमेदवार म्हणून नसलो तरी, प्रत्येक वार्डात होणारे मतदान हे आपल्यालाच होणार आहे याची खात्री आहे. आम्ही दोघांनीही या निवडणुकीत इतरांना संधी देण्याचा संकल्प केला असून, कोणत्याही परिस्थितीत खालापूर पंचायतीवर लाल बावटा डौलाने फडकणार असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. शेतकरी कामगार पक्षाच्या विरोधात इतर सर्व पक्ष एकवटले आहेत. आपल्या पक्षाला पुन्हा संधी देऊ नये म्हणून त्यानी जणू देव पाण्यात बुडवले आहेत. खालापुरात प्रतिकूल परिस्थिती असताना आपण विकासाची जी कामे केलेले आहेत आणि भविष्यातले जे मुद्दे आपण आता येणार आहोत त्याच बळावर आपल्याला मतदार न्याय देतील असे संकेत मिळत असल्याचे संतोष जंगम यानी स्पष्ट केले.

खालापूर नगरपंचायत निवडणुकीत इतर पक्ष उघड उघड युत्या आणि आघाड्या करत आहेत. काही उमेदवारांनी तर आपापसात साटेलोटे केले आहे. शेतकरी कामगार पक्ष मात्र मएकला चलो रेफ अशी भूमिका घेऊन या निवडणुकीत इतिहास घडवेल अशा पद्धतीने संतोष जंगम आणि शिवानी जंगम हे चाणक्य नीतीने निवडणुकीची चाल खेळत आहेत. त्यानी निवडणुकीत घेतलेली माघार पाहता ते स्वार्थासाठी राजकारण करत नसल्याचे दर्शवते, असे मत खालापूर ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनिल चाळके यांनी व्यक्त केले आहे.

Exit mobile version