पाच उमेदवार स्थगिती यादीत
खोपोली | प्रतिनिधी |
नगरपंचायत खालापूर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या 90 पैकी 12 अर्ज छाननीत अवैध ठरले असून, नागरीकांचा मागास प्रवर्ग प्रभागात निवडणुकीला स्थगिती असल्याने त्या प्रभागातील पाच अर्ज निवडणूक रिंगणातून कमी झाल्याने सध्या तरी 73 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
नगरपंचायत खालापूर ची निवडणूक 21 डिसेंबर रोजी पार पडत आहे. सतरा प्रभागांत होणार्या निवडणुकीसाठी सात डिसेंबरपर्यंत 90 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातच नागरिकांचा मागास प्रवर्ग असलेला प्रभागात निवडणूक स्थगित करण्यात आल्याने सोळा प्रभागात निवडणूक होणार आहे. खालापुरातील प्रभाग क्रमांक दोन नागरिकांचा मागास प्रवर्गकरिता आरक्षित होता.या ठिकाणी पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. या पाच जणांचे अर्ज छाननीत अवैध ठरले असले तरी निवडणूक या प्रभागात होणार नाही. बारा डमी उमेदवार अर्ज छाननीत बाद झाले आहेत. मूळ अर्ज वैध ठरल्याने डमी कमी झाले आहे. अर्ज मागे घेण्यासाठी 13डिसेंबर मुदत असून, त्याच दिवशी किती उमेदवार निवडणूक रिंगणात राहणार स्पष्ट होणार आहे.