खांडस-कशेळे राज्यमार्ग रस्त्याचे काम नित्कृष्ट दर्जाचे

राज्यमार्ग रस्त्यावर दोन कोटींची कामे; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील खांडस ते कशेळे या राज्यमार्ग रस्त्यावर डांबरीकरण केले आहे. मात्र त्या रस्त्यावर डांबरीकरण करताना डांबर कमी प्रमाणात वापरले गेले असल्याचे दिसून येत आहेत. त्यात रस्त्यावर तब्बल दोन कोटी रुपये खर्चून डांबरीकरण केले जात असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते मात्र तिकडे फिरकत नसल्याने रस्त्याचे काम नित्कृष्ट दर्जाचे सुरू असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.

कशेळे-खांडस गणेश घाट या सार्वजनिक बांधकाम विभागाचे माध्यमातून रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे. 4300 मीटर लांबीचा रस्ता बनविण्यासाठी दोन कोटींचा निधी मंजूर आहे. नांदगांव फाटा भागात खांडस रस्त्यावर काम सुरू असून स्थानिकांनी सुरू असलेल्या डांबरीकरण याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. रस्ता खराब झाल्याने त्या ठिकाणी सव्वाचार किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर करण्यात येत असलेले कार्पेट डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता यांनी जातीने उभे राहून निविदेप्रमाने काम करून घेण्याची आवश्यकता असते. मात्र अधिकारी रस्त्यावर उभे राहून काम करून घेत नसल्याने ठेकेदारांचे फावले आहे. अधिकारी कामावर उभे राहत नसल्याने त्या ठिकाणी चार इंचाचा थर टाकायचा असतो. मात्र खांडस कशेळे राज्यमार्ग रस्त्यावर सुरू असलेले डांबरीकरण काम हे नित्कृष्ट दर्जाचे असल्याने रस्त्यावर अनेक ठिकाणी नव्याने केलेल्या डांबरीकरणच्या खालील जुना रस्ता दिसू लागला आहे. त्यामुळे अशा नित्कृष्ट डांबरीकरण बद्दल स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विरूध्द आवाज उठविला आहे. त्यात दुसरीकडे खंडास रस्त्यावर प्रत्येक वर्षी डांबरीकरणची कामे सुरू असतात आणि तरी देखील कशेळे-खांडस हा 12 किलोमिटर लांबीचा रस्ता अखंडपणे सुस्थितीत दिसून येत नाही आहे.

दोन कोटी रुपये खर्चून तयार केलेला रस्ता लवकर खराब होणार आहे. त्यामुळे पुन्हा खराब रस्त्यांमधून आम्हाला ये-जा करावी लागते. त्यामुळे अनेकदा अपघात घडतात, तर अनेकांना पाठीचे दुखण्याला सामोरे जावे लागत असल्यामुळे या पुढे निकृष्ट काम हे सहन केले जाणार नाही. आता जे काम उखडले गेले आहे तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन चौकशी करावी.

कांता पादिर, उपाध्यक्ष आदिवासी संघटना

कशेळे-खांडस रस्त्याबाबत तक्रार प्राप्त झाली असल्यामुळे या रस्त्याच्या दर्जाबाबत स्वतः जागेवर जाऊन पाहणी करणार आहे आणि त्यानंतर रस्त्याची पाहणी करून पुढील कार्यवाही करणार आहोत.

संजीव वानखेडे, उप अभियंता
Exit mobile version