खांदेश्‍वर परिसरात सोन्याचे गंथन खेचले

। पनवेल । वार्ताहर ।
पायी चालत जात असलेल्या 50 वर्षीय महिलेच्या गळ्यातील दोन लाख दहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण खेचून चोरटे पसार झाले आहेत. याप्रकरणी खांदेश्‍वर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आसुडगाव येथील राजश्री सिताराम हूदार ह्या त्यांच्या नातेवाईकांसोबत पायी शंकर मंदिर येथील विसर्जन घाटावरून घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या यावेळी त्यांच्या समोरून एका काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरून दोन इसम त्यांच्याजवळ आले. यातील एका इसमाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण खेचून घेतली व ते मोटरसायकलवरून पळून गेले.

Exit mobile version