| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील चिरनेर येथील राजेंद्र खारपाटील यांचा वाढदिवस शुक्रवारी (दि.12) रक्तदान शिबिराचे आयोजन करीत, पी.पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या विद्या संकुलनात साजरा करण्यात आला. तर चिरनेर गावातील श्री महागणपती मित्र मंडळ व महिला मंडळाच्या वतीने देखील चिरनेर गावातील श्री महागणपतीच्या भव्य प्रांगणात खारपाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
प्रारंभी खारपाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी चिरनेरच्या श्री महागणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांसमवेत केक कापून हा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने खारपाटील यांना सकाळपासून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून व फोनवर संपर्क साधून, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
खारपाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने श्री महागणपती मित्रमंडळाचे अध्यक्ष अमर ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मंडळातील अनेक जोडप्यांच्या वतीने त्यांची पंचारतीने ओवाळणी करीत पुष्पगुच्छ देत, औक्षण करण्यात आले. विद्या संकुलनात रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी पी.पी. खारपाटील, संतोष ठाकूर, भास्कर मोकल, सुरेश पाटील, अलंकार परदेशी, अरुण पाटील, सचिन घबाडी, संजय पाटील, वर्षा खारपाटील, सुनिता खारपाटील, सागर खारपाटील, समीर खारपाटील, अर्चना खारपाटील तसेच कुटुंबातील अन्य सदस्य यांच्यासह व्यासपीठावर अनेक मान्यवर तसेच पंचक्रोशीतील वेगवेगळ्या क्षेत्रातील पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.






