लोकवर्गणीतून केली खारबंदिस्तीची कामे


विश्‍वनाथ म्हात्रे यांचा पुढाकार
। जेएनपीटी । वार्ताहर ।
केळवणे गावचे सुपुत्र तथा खलाशी महासंघाचे अध्यक्ष विश्‍वनाथ म्हात्रे यांनी लोकवर्गणीतून केळवणे ते पुनाडे या खाडीकिनार्‍यावरील खारबंदिस्तीची कामे मार्गी लावली. त्यामुळे खार आंत्राबादा केलवणे, पुनाडे व वशेणी ह्या तीन गावची हजारो एकर भातशेती लागवडीखाली येणार असल्याने शेतकर्‍यांनी विश्‍वनाथ म्हात्रे व त्यांच्या सहकार्‍यांचे अभिनंदन केले आहे.

पनवेल व उरण तालुक्यातील केळवणे, पुनाडे या ग्रामपंचायत हद्दीतील खाडीकिनार्‍यावरील बंधार्‍याला उधाणाच्या पाण्यामुळे खांड गेल्याने गेली आठ वर्षे या परिसरातील भातशेती पिकत नव्हती. 2019 ला झालेल्या अतिवृष्टीमुळे सदर खार बंधिस्तीला पुन्हा खांड गेली होती. ही खांड बाधण्याकरिता आ.महेश बालदी यांनी 29 लाखाची आमदार निधी उपलब्ध करून दिली. परंतु समुद्राची पाण्याची पातळी वाढल्यामुळे अनेक ठिकाणाहून पाणी बांधावरून वाहून भातशेतीत येत होते.त्यामुळे खलाशी महासंघाचे अध्यक्ष विश्‍वनाथ म्हात्रे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी आपले मित्र डॉ. बि. जे. घरत, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्‍वर घरत, विनोद ठाकूर, धर्मेद्र भोईर, संदिप घरत व ग्रामपंचायत सदस्य खारपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकवर्गणी आणि देणगीतून पोकलन जेसीबी आणून पाच फुट रुंद, साडेतीन फुट उंच व अंदाजे 5 कि.मी. लांबीचा केलवणे उघर ते पुनाडे, उघर अशा बांधबंदिस्तीचे काम सर्वांच्या देखरेखीखाली पुर्ण केले. विश्‍वनाथ म्हात्रे व त्यांच्या सहकार्‍यांच्या समाजाभिमुख कार्यामुळे उधाणाचे पाणी भातशेतीत शिरणार नसल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Exit mobile version