| अलिबाग | प्रतिनिधी |
खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा दि.16 एप्रिल 2023 रोजी पार पडला. तथापि या सोहळ्याच्या समारोपानंतर काही श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. यात दुर्दैवाने 10 महिला व 4 पुरुष असे एकूण 14 श्री सदस्य मृत्यमुखी पडले. तर 8 व्यक्ती रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्यात येत आहेत. 35 व्यक्तींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
या सर्व मृतांची ओळख पटलेली असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत-
1) तुळशिराम भाऊ वागड
2) जयश्री जगन्नाथ पाटील
3) महेश नारायण गायकर
4) कलावती सिध्दराम वायचाळ 5) मंजूषा कृष्णा भोंबडे
6) भीमा कृष्णा साळवी
7) सविता संजय पवार
8) स्वप्नील सदाशिव केणी
9) पुष्पा मदन गायकर
10) वंदना जगन्नाथ पाटील
11) मिनाक्षी मोहन मेस्त्री
12) गुलाब बबन पाटील
13) विनायक हळदणकर
14) स्वाती राहुल वैद्य