खारघर इस्कॉन मंदिराचे लोकार्पण

। पनवेल । वार्ताहर ।

इस्कॉन मंदिर ट्रस्ट तर्फे खारघरमध्ये उभारण्यात आलेल्या इस्कॉन मंदिराचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम 9 ते 15 जानेवारी 2025 दरम्यान रंगणार आहे. इंटर नॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्सियसन्स (इस्कॉन) एक जागतिक संस्था आहे. जगभरात कृष्णाचा महिमा पोहोचवण्यासाठी इस्कॉन मंदिरे उभारण्यात आली आहेत. भारतासह जगभरात सुमारे 400 पेक्षा अधिक इस्कॉन मंदिरे आहेत. इस्कॉन मंदिरातील अनुयायी जगभर भगवतगीता आणि हिंदू धर्म, संस्कृतीचा प्रचार करत असतात. 2012 मध्ये खारघरमध्ये सेंट्रल पार्क शेजारी इस्कॉन मंदिराचे भूमिपुजन करण्यात आले होते. इस्कॉन मंदिर परिसरात दोन सहा मजली इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. या ठिकाणी भक्ती वेदांत महाविद्यालयात भगवद गीता, भक्तीचे नऊ रस आदींचे अभ्यासक्रम आहेत. याशिवाय वाचकांसाठी देव-देवतांचे सर्व ग्रंथ या वाचनालयात असणार आहेत. या ठिकाणी पंचकर्म सारखे मोफत आयुर्वेदीक उपचार देण्यात येणार आहेत.

Exit mobile version