खरोशीत आरोग्य शिबिर संपन्न

| खरोशी | वार्ताहर |

पेण तालुक्यातील खरोशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच मानसी घरत तसेच कुलदैवत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खरोशी व केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था महाराष्ट्र आणि तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने माधी गणेशउत्सवानिमित्त मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ब्लड प्रेशर, शुगर, नेत्र तपासणी, डॉक्टरांच्या सल्ल्याने हृदयाची ईसीजी, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि औषधे मोफत, कान, नाक घशाचे आजार, यकृताचे आजारांवर मोफत उपचार करण्यात आले. डॉ. रवींद्र कदम, डॉ. प्रविण शिरुडे, दत्ताराम खाडे, सुलेमान शेख, बिबश नाथ, चंद्रकला भांगे, मणाली तेलंगे, रजनी प्रजापती, अरुण लाड यांनी केले. या शिबिराचा लाभ खरोशी गावातील 415 नागरिकांनी घेतला. यावेळी 141 नागरिकांना मोफत चष्मा रोटरी क्लब आकुर्डी पुणे येथील राजु तुपे यांच्या सौजन्याने देण्यात आले.

आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी पंढरीनाथ घरत, महेश घरत, मानसी महेश घरत, धनाजी घरत, कांचन घरत, विद्या घरत, तृप्ती ठाकुर, अनंता ठाकुर, सुधाकर घरत, विजय ठाकुर, गणपत पाटील, प्रकाश घरत, यशवंत घरत, जितेन्द्र घरत, लक्ष्मण घरत, महेंद्र घरत, अनंता घरत, स्वप्निल घरत, मच्छिंद्र घरत, रोहित घरत, रोहन भोंडकर, अंगद घरत, मनोज गावंड, प्रीतम भोंडकर, पिंट्या घरत, सुरज घरत, समाधान पाटील, वैभव घरत यांनी केले.

Exit mobile version