। चिरनेर । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील चिरनेर गावात पी.पी. खारपाटील कन्स्ट्रक्शन अँड कंपनीच्या माध्यमातून खारपाटील सीएनजी गॅस पंप सुरू करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पी.पी. खारपाटील यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, आमदार महेश बालदी तसेच पी.पी. खारपाटील यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.
वाहनचालकांची सेवा करता यावी यासाठी चिरनेर या ग्रामीण भागात पेट्रोल पंप आणि सीएनजी गॅस पंप सुरू करण्याचे स्वप्न कंपनीचे आधारस्तंभ स्वर्गीय परशुराम धाकू खारपाटील अर्थात आबांचे हे स्वप्न होते. ते आज सत्यात उतरले असल्याचे यावेळी पी.पी. खारपाटील यांनी सांगितले. चिरनेर विभागातील जनतेला सीएनजी गॅस भरण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत होती. मात्र, ही अडचण आता खारपाटील सीएनजी गॅस पंपाच्या माध्यमातून दूर होणार असल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला तहसीलदार उद्धव कदम, पोलीस आयुक्त श्री. चव्हाण, माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. खटावकर, सिडकोचे मिलिंद म्हात्रे, उद्योजक परशुराम जितेकर, पी. डी. देशमुख, ॲड. प्रवीण ठाकूर, समीर ठाकूर, परीक्षित ठाकूर, युवराज पाटील, शिवसेना उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर, माजी सभापती भास्कर मोकल, शिवधन पतसंस्थेचे चेअरमन गणेश म्हात्रे, वर्षा खारपटील, सुनिता खारपाटील, स्नेहल पाटील, अर्चना ठाकूर, उपसभापती शुभांगी पाटील, शेकापचे सुरेश पाटील, माजी सरपंच अविनाश म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते सचिन घबाडी, कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील, पोलीस पाटील संजय पाटील, राष्ट्रवादीचे संतोष ठाकूर, उद्योजक घनश्याम पाटील, बबन गोंधळी, अरुण ठाकूर, करण पाटील, रमेश फोफेरकर, आर. एन. पाटील, शेकापचे दिलीप पाटील, प्रदीप पाटील, सुशांत पाटील, महानिगमचे अधिकारी तसेच अन्य मान्यवर मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी प्रथम सीएनजी गॅस भरण्याचा मान पुरोहित संजय जुवेकर यांना प्राप्त झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश पंडित व राजेंद्र भगत यांनी केले.