खरसईचा संसद ग्राम आदर्श योजनेत समावेश करणार – तटकरे

| म्हसळा | वार्ताहर |

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी श्रीवर्धन तालुक्यातील वडवली गावाच्या धर्तीवर आता संसद ग्राम आदर्श योजनेत खरसई गावाचा समावेश करण्यात येईल अशी घोषणा खा.सुनिल तटकरे यांनी केली.

धरणग्रस्त खरसई गावाला स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजनेसाठी अवघ्या आठ दिवसांचे कालावधीत 1 कोटी 97 लक्ष रुपयांचा निधीची मंजुरी मिळवून देत योजनेची प्रशासकीय मान्यता पत्र ग्रामस्थांना सुपुर्द केल. त्यानिमित्त पाच समाजाचे ग्रामस्थ मंडळी व खरसई ग्राम पंचायतीचे वतीने खासदार तटकरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला होता. या वेळी कार्यक्रमाला अली कौचाली, महादेव पाटील, समीर बनकर, माजी सभापती बबन मनवे, अंकुश खडस, निलेश मांदाडकर, परशुराम मांदाडकर, छाया म्हात्रे, संदीप चाचले, सोनल घोले, रेश्मा कानसे, मधुकर गायकर, मीना टिंगरे, अनिल कासारे, तुकाराम मांदाडकर आदी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार तटकरे यांनी अधिक सांगताना खरसई गावात धरणाचे काम कार्यान्वीत झाले असले तरी मी पालकमंत्री आणि राज्याचा अर्थमंत्री असताना या धरण पुर्तीचे कामाला निधी उपलब्ध करून दिला आणि खर्‍या अर्थाने आज मुहूर्त स्वरूप आला आहे. याच धरणाचे कालव्याचे विहिरीतून गावात दोन कोटी आणि तोंडसुरे गावासाठी 10 कोटी 33 लक्ष रुपयांचे पाणी पुरवठा योजनेसाठी मंजुरी मिळविण्यात आली आहे. येत्या वर्षभरात खरसई धरणाचे कालव्याच्या कामाला आवश्यक निधीची मंजुरी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचे जमिनीची व बागायतीची भरपाई आणि शासनाकडून धरणग्रस्तांना सवलत मिळण्यासाठी योग्य प्रयत्न करण्यात येईल असे आश्‍वासनही त्यांनी दिले.

ग्रामस्थानी धरणात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या पाण्याचा उपयोग या पुढे दुबार पीक, फळबागायत, भाजीपाला लागवडीसाठी करावा. गाव सुजलाम सुफलाम आणि सामाजिक एकता बंधुता कायम जोपासावी.

खा.सुनील तटकरे
Exit mobile version