सांघिक 36, तर वैयक्तिक खेळात 16 प्रमाणपत्रे
| कोर्लई | वार्ताहर |
नुकत्याच मदरसा बायपास म्हसळा येथे पार पडलेल्या तालुका स्तरावरील वैयक्तिक आणि सांघिक, पावसाळी क्रीडा स्पर्धेत प्राथमिक शाळा गटात खरसई येथील रायगड जिल्हा परिषदेच्या आदर्श मराठी (मॉडेल स्कूल) शाळेने अव्वल स्थान पटकाविले आहे.
यावर्षी सांघिक खेळ कबड्डी, खोखो, योगासने, बुध्दिबळ, रिले, वैयक्तिक खेळ धावणे, थाळी फेक, गोळा फेक, लांब उडी, उंच उडी, आर्चरी (कंपाऊंड), कुस्ती (फ्रीस्टाईल), योगासने ( रिदमिक/आर्टिस्टीक) इत्यादी खेळात मुले, मुली दोन्ही गटांत शाळेतून 40 खेळाडू तालुका व जिल्हा स्तरावर सहभागी झाले होते.
तालुका स्तरावर कुस्ती फ्रीस्टाईलमध्ये 36 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक नम्रता म्हात्रे, 50 किलो वजनी गटात प्रथम सार्थकी गाणेकर, मुले-52 किलो वजनी गटात प्रथम भावेश भूनेसर, 36 किलो वजनी गटात मानस पाटील द्वितीय, बुध्दिबळ- दिप्ती मांदाडकरने द्वितीय क्रमांक पटकावला. योगासने जिल्हा स्तरावर वैयक्तिक रिधामिक उज्वला खोत प्रथम, सांघिक मुली योगासनेमध्ये प्रथम क्रमांक नम्रता म्हात्रे, उज्वला किशोर खोत चतुर्थ, योगासने मुले- सांघिक प्रणय शितकर प्रथम, किशोर खोत चतुर्थ क्रमांक पटकावला. मैदानी स्पर्धेत लांब उडी दिपाली वेटकोळी- तृतीय, थाळी फेक- वृषाली म्हसकर तृतीय, गोळा फेक- नम्रता म्हात्रे तृतीय, उंच उडी- सई खोतने तृतीय क्रमांक पटकावला. सर्व विद्यार्थी 14 वर्षांखालील वयोगटात खेळून यशस्वी झाले आहेत.
क्रीडा क्षेत्रासाठी भरीव मार्गदर्शन लक्ष्मण पाटील, उत्तम मांदारे, हेमंत पयेर, प्रसाद खोत,सागर घुबे, शुभम नाक्ती, अजय पयेर, शाळा स्तरावरचे नियोजन मुख्याध्यापक शारदा कोळसे, सहकारी शिक्षक संदीप शेबांळे, राम थोरात, क्रीडा शिक्षक जयसिंग बेटकर यांनी केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश मांदाडकर, उपाध्यक्ष जगदीश खोत, सदस्य जनार्दन खोत, गणेश मांदाडकर, हरिश्चंद्र वेटकोळी, प्रभाकर कांबळे, रामचंद्र मांदारे, काशिनाथ माळी, जयप्रभा माळी,तारा पाटील, संपदा मांदारे, भिमा वेटकोळी आदी. मान्यवरांनी यशस्वी स्पर्धेकांचे अभिनंदन केले.