खतगावकरांची भाजपला सोडचिठ्ठी

नांदेड | प्रतिनिधी |

देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वीच भाजपमधील दुफळी उघड झाली आहे. माजी मंत्री व जेष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे आता आगामी काळातील निवडणुकीची समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. भाजपमधून राजीनामा दिल्यानंतर ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भास्करराव पाटील यांच्यासह माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा आणि भारतीय जनता पक्षातील अनेक पदाधिकार्‍यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भास्करराव पाटील खतगावकर हे नांदेड जिल्ह्यातील मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. पाटील हे तीन वेळा आमदार, तीन वेळा खासदार व राज्याचे मंत्री देखील राहिले आहेत.

Exit mobile version