। खेड। अजित जाधव ।
खेड शहरात ओल्या व सुक्या कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे खेड नगर परिषदेला राष्ट्रीय पातळीवरील कचरामुक्त शहर हा पुरस्कार प्राप्त झाला असून त्यासाठी देशपातळीवर 36 वे मानांकन प्राप्त झाले आहे. दि 20 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामुळे आता स्वच्छतेमध्ये खेडला 3 स्टार अवॉर्ड मिळाला असून नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी शहरवासीयांचे व सर्व नगरसेवकांचे आभार मानले आहेत.
या मानांकनाचा दुसर्यांदा बहुमान खेड पालिकेला प्राप्त झाला आहे. राज्यातील 257 नगर परिषदा असून त्यापैकी 69 नगर परिषदांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली होती. नगराध्यक्ष वैभव खेडेकर, सुनील दरेकर, प्रशांत कदम, प्रभारी मुख्याधिकारी देवानंद ढेकळे, महेंद्र शिरगावकर यांसह सर्व नगरसेवक व स्वच्छता विभागाचे कर्मचारी स्वच्छ खेड- सुंदर खेड संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी झटत आहेत.हा पुरस्कार स्वीकारण्यास मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, शिरगावकर, इलियाज खतीब व नगराध्यक्ष वैभव खेडेकर उपस्थित होते.
खेड शहराचा थ्री स्टार अवॉर्ड देऊन गौरव
