नीरज चोप्रासह 12 जणांना खेलरत्न

राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान
मिताली राज, सुनिल छेत्री, रवीकुमार दहियाचाही समावेश
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून देणार्‍या नीरज चोप्राला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. नीरज चोप्रासह 12 खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या सर्वांना शनिवारी राजभवानात पुरस्कार प्रदान करण्यात आला.
क्रिकेटपटू मिताली राज, फुटबॉलपटू सुनील छेत्री, ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता कुस्तीपटू रवीकुमार दहिया, बॉक्सिंगपटू लवलिना बोर्गोहेईन, हॉकीपटू पीआर श्रीजेश व मनप्रीतसिंह यांनाही खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच, बॅडमिंटनपटू प्रमोद भगत, कृष्णा नागर, नेमबाज एम नरवाल, पॅरालिम्पिक स्पर्धेतील पदक विजेती अवनी लेखरा आणि भालाफेकपटू सुमीत अंतिल यांनादेखील पुरस्कार देण्यात आला.
याशिवाय, क्रिकेटपटू शिखर धवन, पॅराबॅडमिंटनपटू सुहास यथिराज, पॅरा टेबल टेनिसपटू भाविना पटेल, उंच उडीतील खेळाडू निषाद कुमार आणि ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकणार्‍या भारतीय पुरूष हॉकी संघातील सर्वच खेळाडूंसह 35 जणांना अर्जुन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पहिली महिला क्रिकेटर
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित होणारी मिताली राज ही पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर मितालीने ट्विटरवर लिहिलं की, खेळातील महिला या बदलाच्या शक्तिशाली उत्प्रेरक असतात आणि जेव्हा त्यांना त्यांच्या पात्रतेचं कौतुक मिळतं, तेव्हा त्या इतर अनेक महिलांना त्यांच्या स्वप्नांचं अनुसरण करण्यास प्रेरित करतात. ममला मनापासून आशा आहे की माझा प्रवास देशभरातील तरुण मुलींना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रेरणा देईल.फ मितालीने 220 एकदिवसीय आणि 89 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भरारत देशाचं प्रतिनिधित्व केलं आहे.

Exit mobile version