स्नेहल माळीने पटकावले दोन रौप्य पदके
| पनवेल | वार्ताहर |
खेलो इंडिया पश्चिम विभाग स्पर्धेत रायगडची कन्या स्नेहल माळीने दोन रौप्य पदक पटकावत जिल्ह्याला नावलौकिक मिळवून दिले आहे. केंद्र सरकारच्या खेलो इंडिया अंतर्गत सुरू असलेल्या पश्चिम विभाग महिला सायकल लिग स्पर्धेत (महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड, गोवा, कर्नाटक, गुजरात) या राज्यातुन सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत अनेक राष्ट्रीय, राज्यस्तरावरील पदक विजेते खेळाडू सहभागी झाले. यात रायगड जिल्ह्यातील स्नेहल शत्रुघ्न माळी हिने टाईप ट्रायल 10 किमोमीटर व मास स्टार्ट 30 किलोमीटर या दोन प्रकारात दोन रौप्य पदक पटकवले आहेत. या स्पर्धेचे बक्षीस सभारंभ भारताचे महिला व्हॉलीबॉल संघाच्या कर्णधार निर्मल तनवर यांच्या हस्ते पार पडले तर शरयु मोटर्सच्या संचालक शर्मिला पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे संजय साठे, राष्ट्रीय महिला प्रशिक्षक दिपाली पाटील व फेनिक्स सायकलिंग क्लबचे प्रशिक्षक दर्शन बारगुजे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन स्नेहलला लाभले आहे. दरम्यान, गुजरात येथे होणाऱ्या नॅशनल खेलो इंडिया स्पर्धेत स्नेहल ही महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहे.