खेळू दहिंबेकर यांचे निधन

। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील गोवे येथील रहिवासी खेळू हरि दहिंबेकर यांचे शुक्रवारी (दि.5) अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यु समयी त्यांचे वय 51 वर्षाचे होते.ते परोपकारी व प्रेमळ स्वभावाने सर्वाना परिचित होते. सामाजिक कार्यात ते नेहमी सक्रिय होते. त्यांना लहान व थोर मंडळी खेळू मामा या नावाने हाक मारीत असत.त्यांच्या पश्‍चात त्यांची पत्नी, आई, एक मुलगा, चार मुली, बहिणी, पुतणे, भावजय, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी व उत्तरकार्य विधी एकाच दिवशी रविवारी (दि.14) त्यांचे पुतणे उत्तम दहिंबेकर यांच्या निवास्थानी होणार आहेत.

Exit mobile version