| सुतारवाडी | प्रतिनिधी |
सुएसोच्या द.ग. तटकरे माध्यमिक विद्यालय सुतारवाडी या विद्यालयाच्या मैदानामध्ये दि.15 ते 16 सप्टेंबरदरम्यान तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये रोहा तालुक्यातील विविध शाळांनी सहभाग दर्शविला. या स्पर्धेचे उद्घाटन येरलचे सरपंच सुरेश जाधव व उपसरपंच कविता तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत मुलांचे 38 संघ तर मुलींचे 26 संघ सहभागी झाले होते.
यावेळी स्कूल कमिटीचे अध्यक्ष दत्ताराम मंचेकर, येरळ तंटामुक्ती अध्यक्ष संजय मुंबरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चिंतामण दळवी, माजी तंटामुक्ती अध्यक्ष माणिकराव सावंत, सदस्य राजेंद्र अडली, कर शिवशंभो ज्येष्ठ नागरिक संघ सुतारवाडीचे अध्यक्ष मनोहर साळवी, समन्वयक काणेकर, मुख्याध्यापक श्रीराम काळे, महेश बामूगडे, प्राचार्य भालेराव, माजी शिक्षक गायकवाड, सुतारवाडी हायस्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विविध शाळांतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
या स्पर्धेत 14 वर्षे मुलींच्या गटात प्रथम क्रमांक रा.ग. पोटफोडे मास्तर विद्यालय खांब, द्वितीय क्रमांक एमपीएस एस इंग्लिश मीडियम कोलाड, तर मुलांच्या गटात प्रथम क्रमांक सानेगाव हायस्कूल व द्वितीय क्रमांक जिंदाल इंग्लिश मीडियम स्कूलने पटकावला आहे. 17 वर्ष मुलींच्या गटात प्रथम क्रमांक विरजोली हायस्कूल व द्वितीय क्रमांक रा.ग. पोटफोडे मास्तर विद्यालय खांब, तर मुलांच्या गटात प्रथम क्रमांक सानेगाव हायस्कूल व द्वितीय क्रमांक सानेगाव आश्रम शाळेने पटकावला आहे. तसेच, 19 वर्षे मुलींच्या गटात प्रथम क्रमांक जिंदाल इंग्लिश स्कूल व द्वितीय क्रमांक मेंहदले हायस्कूल रोहा, तर मुलांच्या गटात प्रथम क्रमांक मेंदळे हायस्कूल व द्वितीय क्रमांक जूनियर कॉलेज कोलाड यांनी पटकावला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुतारवाडी हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक शिवाजीराव मोटे यांनी केले. तसेच, यशस्वी शाळांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.







