खोपोली क्राईम! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गोळीबार

shot from a handgun with fire and smoke

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरुन आरोपीने थेट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सोलापूर तालुक्यरतील रामनगर येथील फिर्यादी ऑरेंज ट्रव्हल्सची पीवाय 02 सीआर 4773 ही बस बोरीवली मुंबई ते हैद्राबाद अशी घेऊन जात होते. यावेळी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाट येथील चढण चढीत असताना त्यांच्या लेनमध्ये ट्रक बंद पडलेला त्यांना दिसून आला. त्यामुळे फिर्यादीने लेन बदलली. दरम्यान, पाठीमागून येणाऱ्या बीएमडब्लु 23 बीएच 3204 बी यांना पुढे जाऊ न दिल्याच्या कारणावरुन चालकाने फिर्यादींची बस थांबविली. तसेच कारमधील दोघांनी बसच्या काचा फोडल्या. तसेच चालकालाही हॉकी स्टीकने मारहाण केली. यावेळी फिर्यादी बसमधून खाली उतरत असताना आरोपीने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्याकडील रिव्हॉल्व्हरमधुन गोळीबार केला. दरम्यान, कारमधील एकजण पळून गेला. तर गोळीबार करणाऱ्याला रविवारी सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले.

हा आरोपी पुणे जिल्ह्यातील भिमनगर, वैदवाडी, हडपसर येथील रहिवासी असून दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरु आहे. साथीदार पळुन गेला. याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version