खोपोलीत शिक्षण मंथन शिबीर

खोपोली | वार्ताहर |
खोपोली शहरातील विद्यार्थ्यांना नवीन शिक्षण पद्धतीचे मार्गदर्शन व्हावे यासाठी वसंत विद्या विकास ट्रस्ट संचालित वसंत देशमुख मेमोरियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स च्या वतीने सर्व पालक व विद्यार्थी यांच्यासाठी शिक्षण मंथन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेंद्र थोरवे , शिक्षण तज्ञ व समुपदेशक विक्रम बालाजीवाले उपस्थित होते . संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उल्हास देशमुख यांच्या शिक्षण कार्याचा आवर्जून उल्लेख केला. संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी तेजस्वी शैलेजा उल्हास देशमुख यांनी हेतू स्पष्ट केला यावेळी पंकज पाटील,अनिल सानप,अनिल कुलकर्णी ,सेक्रेटरी शैलजा देशमुख, खजिनदार सुनील वैद्य, मुख्याध्यापिका सीमा नाईक, अश्‍विनी वाघुले,सुनील जाधव सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले .

Exit mobile version