खुशीची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड

| म्हसळा | वार्ताहर |
सन 2023 मध्ये घेण्यात आलेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा खारगाव बुद्रुक या शाळेतील विद्यार्थिनी खुशी सुरेंद्र सुतार हिची जवाहर नवोदय विद्यालय निजामपूर, ता. माणगाव या ठिकाणी इयत्ता सहावी प्रवेशासाठी निवड झालेली आहे.

त्याबद्दल खुशीचे व तिच्या पालक तथा सरपंच अनंत नाक्ती, शाळा व्यवस्थापन समिती हेमंत नाक्ती, शाळेचे मुख्याध्यापक बिचुकले, वर्गशिक्षक व मार्गदर्शक नागनाथ गव्हाणे, कंडे सर तसेच सदस्य शाळा व्यवस्थापन समिती खारगाव बुद्रुक, सर्व पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले. तसेच तिच्या पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Exit mobile version