पनवेलमध्ये किकबॉक्सिग स्पर्धेचे आयोजन

खेळाडूंनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद
। रसायनी । वार्ताहर ।
किकबॉक्सिंग स्पोर्ट्स अससोसिएशन महाराष्ट्र (वाको महाराष्ट्र) मान्यतेने आयोजन अम्याच्युअर किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन पनवेल यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी व्हिडिओ कॉन्फरेन्सने निलेश शेलार अध्यक्ष किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र यांनी सर्वांचे मनोबल वाढवले व योग्य मार्गदर्शनही केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजू कोळी, अध्यक्ष जयेश चोगले अम्याच्युअर किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन पनवेल, सचिव दिक्षा जैन अम्याच्युअर किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन, उपाध्यक्ष भूपेंद्र गायकवाड, अम्याच्युअर किकबॉक्सिंग स्पोर्ट्स अससोसिएशन पनवेल, महेंद्र कोळी, मंदार चावळकर, हिरा घरती, गोपाळ म्हात्रे, संतोष मोकल, योगेश जाधव, वैभव राहते हे उपस्थित होते. या स्पर्धेत 160 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा संपूर्ण नियमात खेळविण्यात आली. यावेळी ठिकठिकाणच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी दाखवून यश संपादन केले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक राजू कोळी व टीम, द्वितीय क्रमांक भूपेंद्र गायकवाड व टीम, तृतीय क्रमांक वैभव राहते व टीम, चतुर्थ क्रमांक मंदार व हिरा यांनी चॅम्पिनशिप ट्रॉफी या संघाने पटकावले.
या स्पर्धेत अध्यक्ष जयेश चोगले यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या व स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी शिल्पाम सरकार, केदार खांबे, वैष्णवी कोंढाळकर धनेश शिंगोटे, मृणाली धुमाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लागले. या स्पर्धेतील सुवर्णपदक खेळाडू दि.29 ते 31 ऑक्टोबर रोजी अहमदनगर येथे राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत सहभाग होणार आहेत.

Exit mobile version