। सुधागड । वार्ताहर ।
अपहरण व बेपत्ता हे असे प्रकार सध्या सगळीकडेच सातत्याने सुरू असतानाच सुधागड मधील आमणोली येथील 14 वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला आहे. सुधागड मधील आमणोली बौध्दवाडा येथे राहणार्या फिर्यादी यांच्या 14 वर्षांचा मुलाला दि.6 नोव्हेंबर रोजी कोणीतरी अज्ञात इसमाने त्याच्या लहानपणाचा व अज्ञानपणाचा फायदा घेऊन, त्यास फुस लावून राहत्या घरामधून पळवून नेला आहे. याबाबत पाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास मपोह/65 परदेशी हे करीत आहेत.