| पनवेल | वार्ताहर |
राहत्या घराच्या परिसरात खेळात असलेल्या एका 9 वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याने याबाबतची तक्रार त्याच्या वडिलांनी तळोजा पोलीस ठाण्यात केली आहे. राज अशोक चव्हाण (वय 9) रा. राजाराम म्हात्रे चाळ, नावडे गाव, रंग गोरा, अंगाने सडपातळ, नाक सरळ, डोळे काळे, केस काळे बारीक असून अंगात काळ्या रंगाचे हाफ टी शर्ट व निळ्या रंगाची फुल जीन्स पँट व गुडघ्यावर फाटलेली आहे. तसेच गळ्यात पंचरंगी धातू त्यात छोटी पेटी आहे.
या मुलांबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास तळोजा पोलीस ठाणे फोन – 022-27412333 किंवा पोलीस उप निरीक्षक एस.ए.होलार – 8108161709 येथे संपर्क साधावा .