| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील हेदुटणे येथे राहणाऱ्या एका 16 वर्षीय तरुणीचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून तिचे अपहरण केल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुजा हिरामण उघडा, असे तरुणीचे नाव असून, रंग-गव्हाळ, उंची पाच फुट, डोळे काळे, केस काळे लांब, नाक-सरळ व टोचलेले, अंगात पांढऱ्या रंगाचे पट्टे असलेला टी शर्ट व काळ्या रंगाची फुल पॅन्ट, भाषा मराठी, हिंदी व इंग्रजी बोलते, सोबत काळ्या रंगाची सॅक व कपडे घेऊन गेली आहे. या तरुणीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी यांच्याशी संपर्क साधावा.







