तलवारीने वार करून तरुणाची हत्या

| ठाणे | वृत्तसंस्था |

तलवारीने वार करून एक जणाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. सतीश पाटील असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या हत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.सतीश पाटील हे वर्तकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहण्यास असून त्यांचा इस्टेट ब्रोकरचा व्यवसाय होता. शनिवारी (दि.9) रात्री कासारवडवली आनंदनगर परिसरात पाटील गेले असता त्यांच्यावर हल्ला झाला. त्यांच्या चारचाकीला दोन तरुणांनी दुचाकी आडवी घालून थांबवले. गाडीचा दरवाजा उघडून त्यांनी पाटील यांच्यावर तलवारीने वार केले. यात सतीश पाटील हे गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावले. त्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. ही हत्या आर्थिक व्यवहारातून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Exit mobile version