किंग कोहलीची ‘विराट’ खेळी

शतकाने साजरा केला वाढदिवस;
सचिनच्या विक्रमाशी केली बरोबरी

| कोलकाता | वृत्तसंस्था |

विराट कोहलीने अखेर आपले 49 वे एकदिवसीय शतक पूर्ण केले. वाढदिवसाला विराट कोहलीच्या बॅटमधून आलेले हे विक्रमी शतक खास ठरले. त्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात 119 चेंडूत शतक ठोकले. त्याने सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 49 शतके ठोकण्याच्या विक्रमाशी विराट कोहलीने बरोबरी केली. त्याने इडन गार्डनवरच्या संथ आणि फिरकीला साथ देणाऱ्या आव्हानात्मक खेळपट्टीवर झुंजार शतकी खेळी केली. विराटने हे शतक 119 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले.त्याच्या या शतकी खेळीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 326 धावसंख्या उभारली.

विराट कोहलीने 119 चेंडूत शतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 49 वे शतक होते. या बाबतीत त्याने महान फलंदाज आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. सचिनने वनडेमध्ये 49 शतके झळकावली आहेत. सचिनने 452 एकदिवसीय डावात ही कामगिरी केली होती, तर विराट कोहलीने 277 व्या एकदिवसीय डावात 49 शतके झळकावली आहेत. यात विशेष म्हणजे आज वाढदिवसाच्या दिवशी त्याने शतक झळकावून विक्रमाची बरोबरी केली. या विश्वचषकातील त्याचे हे दुसरे शतक ठरले. विराट कोहलीने 49 वे शतक पूर्ण केले. विराट कोहलीचे हे 79 वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले.

विराट कोहली हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 49 शतक पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने 277 डावात ही किमया केली तर सचिन तेंडुलकरने 451 डावात 49 एकदिवसीय शतके केली होती. विराट कोहलीने सचिनच्या 49 व्या एकदिवसीय शतकांच्या विक्रमाशी यापूर्वीच बरोबरी केली असती मात्र श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात 94 चेंडूत 88 धावा करून बाद झाला. तर न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात त्याचे अर्धशतक अवघ्या 5 धावांनी हुकले. तो 104 चेंडूत 95 धावा करून बाद झाला. तो षटकार मारण्याच्या नादात बाद झाला होता. आज शतक झळकावत विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या वाढदिवशी शतक ठोकणारा सातवा खेळाडू ठरला आहे. टॉम लॅथम, रॉस टेलर, सनथ जयसूर्या, मिचेल मार्श, सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी यापूर्वी ही कामगिरी केली आहे.

Exit mobile version