| मुंबई । वृत्तसंस्था ।
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शनिवारी बांगलादेशविरुद्धच्या तिसर्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावून एक विशेष कामगिरी केली आहे. कोहलीने ऑगस्ट 2019 नंतर पहिले एकदिवसीय शतक झळकावले आणि एका महान फलंदाजाचा विक्रम मोडला. कोहलीच्या कारकिर्दीतील हे 72 वे शतक आहे. यासह तो आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत दुसर्या स्थानावर पोहोचला आहे. विराटचे वनडेतील हे 44 वे शतक आहे.
कोहलीने आंतरराष्ट्रीय स्तरावर 71 शतके झळकावणारा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला मागे सोडले. तसे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम महान सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके झळकावली आहेत. कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात केवळ 85 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने शतक पूर्ण केले. इबादत हुसेनने टाकलेल्या 39व्या षटकातील चौथ्या चेंडूवर कोहलीने फाइन लेगच्या दिशेने षटकार मारून शतक पूर्ण केले.