बँक ऑफ इंडियातर्फे किसान दिवस

| श्रीवर्धन | वार्ताहर |

बँक ऑफ इंडियातर्फे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी 19 जुलै हा दिवस किसान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विभागीय प्रमुख मुकेश कुमार, उपविभागीय प्रमुख बिरेन चॅटर्जी यांनी पेण येथे तसेच जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक विजय कुलकर्णी यांनी माणगाव येथे किसान दिवस साजरा केला.

बँक ऑफ इंडिया नेहमीच समाजाच्या शेवटच्या सर्व घटकापर्यंत सेवा देण्यास कटिबध्द आहे. सर्व ग्राहकांनी बँकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय प्रमुख मुकेश कुमार यांनी केले. यावेळी शेतकरी, महिला बचत गट, उमेद कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी किसान क्रेडिट कार्ड, बचत गट कर्ज, कृषी वाहन, सुवर्ण कर्ज आदी कर्जांचे वाटप सर्व शाखांमधून करण्यात आले. यादिवशी बँक ऑफ इंडियातर्फे संपूर्ण जिल्ह्यात कृषी संबंधित योजनांमध्ये 10 कोटी कर्ज वाटप करण्यात आले, अशी माहिती कृषी विभाग प्रमुख सुधीर गायकवाड यांनी दिली. किसान दिवसाच्या यशस्वीतेसाठी कृषी विभागाचे अधिकारी विकास म्हेत्रे यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version