| अलिबाग । वार्ताहर ।
भारतीय स्टेट बंकेचे क्षेत्रीय प्रबंधक धर्मेंद्र सिंग् यांच्या मार्गदशनाखाली भारतीय स्टेट बँक अलिबाग यांच्या सहकार्याने हॉटेल ट्रॉपिकांना, अलिबाग, रायगड येथे (दि.11) सप्टेंबर रोजी महिल बचत गट व मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना अंतर्गत लाभार्थ्यांना कर्ज वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमचे प्रमुख पाहुणे भारतीय स्टेट बँकेचे महाव्यवस्थापक मनोज कुमार सिन्हा यानी उपस्थित लाभर्थ्याना मार्गदर्शन केले.
यावेळी सनातन मिश्रा, धर्मेंद्र सिंघ यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले. सदर कर्यक्रमास भारतीय स्टेट बँक, अलिबाग मुख्य प्रबंधक राजेश ठाकुर, भारतीय स्टेट बँक, सुधागड पाली, मुख्य प्रबंधक, मुकुंद कांबळे, झिराड शाखव्यवस्थापक मुकेश कुमार, संजय गोळे प्रबंधक अलिबाग शाखा, श्रेयस भिडे प्रबंधक क्षेत्रीय कार्यालय पेण ह्यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमासाठी उमेद अभियानातील बैंक सखी, स्वयं सहाय्यता समूहातील महीला सदस्या, उचएॠझ लाभार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय स्टेट बंकेचे जिल्हा समन्वयक् प्रकाश तांबे यांनी केले.