उरणचे जलतरणपटू चमकले; कोल्हापूरमध्ये पदकांची लयलूट

| उरण | वार्ताहर |
कोल्हापूर येथे झालेल्या जलतरण स्पर्धेमध्ये उरणच्या किशोर पाटील आणि हितेश भोईर यांनी चार सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदकांची कामाई केली आहे. तसेच सांघिक रिले स्पर्धेमध्ये एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक मिळवून स्पर्धेमधील आपली चमक दाखवून दिली आहे.

महाराष्ट्रात स्टेट वेट्रन्स ॲक्वाटिक स्वीमिंग असोसिशन यांच्या माध्यमातून कोल्हापूर येथील सागर पाटील जलतरण तलाव येथे मास्टर्स जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यातून स्पर्धकांनी सहभाग घेत आपले जलतरणामधील कसब दाखवले. यावेळी उरण तालुक्यातून किशोर केशव पाटील आणि हितेश जगन्नाथ भोईर या दोन स्पर्धकांनी उत्कृष्ट स्पर्धा करत स्पर्धेवर आपली छाप सोडली आहे.

किशोर पाटील हे खारघर, नवी मुंबई येथील जलतरण तालाव येथे प्रशिक्षक आहेत. तर हितेश भोईर हे उरण नगर परिषदेच्या जलतरण तलाव येथे प्रशिक्षक आहेत. जलतरणपटू घडवत असताना आपण स्वतःदेखील तितकेच तरबेज असल्याचे त्यांनी या स्पर्धेमध्ये मिळवलेल्या यशानंतर सिद्ध केले आहे. किशीर पाटील यांनी 200 मी. फ्रिस्टाईल, 400 मी फ्रिस्टाईल, आणि 200 मी. आयएम या तीन स्पर्धेमधून तीन सुवर्ण, तर 50 मी. बटरफ्लाय स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळवले असून, सांघिक रिले स्पर्धेमध्ये रौप्यपदकाची कामाई केली आहे.

हितेश भोईर याने 100 मी. फ्रिस्टाईल गोल्ड, 50 मी. बटरफ्लायमध्ये रौप्य आणि 200 मी. आयएम या स्पर्धेमध्ये कांस्यपदकाची कामाई केली असून, सांघिक रिले स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. या दोनही स्पर्धकांचे जिल्हाभरातून कौतुक केले जात असून, शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version