। कोर्लई । वार्ताहर ।
पनवेल येथील प्रसिद्ध उद्योगपती जे. एम. म्हात्रे यांचे पुत्र राजेश म्हात्रे यांच्या हस्ते दैनिक बाळकडूचे पत्रकार किशोर जानू पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात किशोर पाटील यांचा आगळावेगळा ठसा असून पत्रकारितेची ओढ, विविध क्षेत्रात काम करणाच्या उत्कृष्ट शैलीमुळे त्यांची राज्य दैनिक बाळकडूचे संपादक दिपक खरात यांच्यामार्फ़त निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल राजेंद्र पाटील, सम्राट काना ठाकूर, विनेश पेवेकर, कृष्णा कडू , प्रभाकर पाटील, संगीता राजेंद्र पाटील, नारायण दमडे उपस्थित होते.