आयपीएलच्या ट्रॉफीवर केकेआरने नाव कोरले

| चेन्नई | वृत्तसंस्था |

आयपीएलच्या 17 व्या हंगामाचे विजेतेपद कोलकाता नाईट रायडर्स संघाने जिंकले. कोलकाता नाईट रायडर्सने अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव करत तिसर्‍यांदा आयपीएल ट्रॉफीवर तिसर्‍यांदा नाव कोरले. आयपीएलमध्ये केकेआर संघाने 10 वर्षानंतर ट्रॉफी जिंकली आहे. यावेळी कोलकाता नाईट रायडर्सची कामगिरी उत्कृष्ट राहिली. यासह कोलकाता नाईट रायडर्सनेही या मोसमात अशी कामगिरी केली, जी यापूर्वी आयपीएलमध्ये एकदाच पाहायला मिळाली होती.

आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिला. साखळी फेरीत केकेआरने 14 पैकी 9 सामने जिंकले होते आणि केवळ 3 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचवेळी पावसामुळे 2 सामने रद्द झाले. यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने क्वालिफायर-1 सामना जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्‍चित केले. आता सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून तिसर्‍यांदा चॅम्पियन ठरले. म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्सला या मोसमात एकूण 3 पराभवांना सामोरे जावे लागले.

आयपीएलच्या एका हंगामात सर्वात कमी सामने गमावणाराकोलकाता नाइट रायडर्ससंयुक्तपणे पहिला संघ ठरला आहे. याआधी, 2008 मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या आयपीएल हंगामातहीराजस्थान रॉयल्ससंघाला केवळ 3 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता. विशेष म्हणजे त्या मोसमात राजस्थान रॉयल्सनेही ट्रॉफीवर कब्जा केला होता. त्याच वेळी, या यादीत दुसर्‍या स्थानावर गुजरात टायटन्सचा संघ आहे, ज्याने 2022 मध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल हंगामात केवळ 4 सामने गमावले आणि ते देखील चॅम्पियन बनले होते.

अंतिम सामन्यात सनरायझर्सं हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जो केकेआरच्या गोलंदांजांनी चमकदार कागमगिरी करत चुकीचा सिद्ध करतानासनरायझर्स हैदराबादसंघाला 18.3 षटकात 113 धावांवर रोखले. त्यानंतर अवघ्या 10.3 षटकांत त्याने हे लक्ष्य गाठले. केकेआरच्या लक्ष्याचा पाठलाग करताना व्यंकटेश अय्यरच्या बॅटमधून शानदार खेळी पाहायला मिळाली. त्याने नाबाद अर्धशतक झळकावले.

कोट्यवधी रकमेच्या बक्षिसांची लयलुट
विजेता संघ
आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव करून ट्रॉफी जिंकली म्हणून कोलकत्ता संघाला 20 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले.
उपविजेता संघ
आयपीएल 2024 चा उपविजेता संघ हा हैदराबाद ठरल्यामुळे त्यांना उपविजेतेपदासाठी 12. 5 कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले.
इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीजन
हैदराबादचा 21 वर्षीय अष्टपैलू नितीश रेड्डी याला आयपीएल 2024 चा इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझनचा पुरस्कार मिळाला आहे. रेड्डीने या हंगामात 13 सामन्यात 33.67 च्या सरासरीने 303 धावा केल्या आणि गोलंदाजीत तिन बळीही घेतले. नितीशने त्याच्या पहिल्याच हंगामात दमदार कामगिरी केल्यामुळे त्याला त्यासाठी बक्षिस म्हणून दहा लाख रुपये मिळाले.
ऑरेंज कॅप
या हंगामात विराट कोहलीने 15 सामन्यांत 61.75 च्या सरासरीने 741 सर्वाधिक धावा केल्यामुळे तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला, त्याला त्याच्या या दमदार कामगिरीमुळे दहा लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले.
पर्पल कॅप
या हंगामात पंजाब किंग्जकडून खेळताना हर्षलने 14 सामान्यत सर्वाधिक 24 विकेट्स घेतल्या आहेत, त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याला पर्पल कॅप आणि बक्षीस म्हणून दहा लाख रुपये मिळाले.
स्ट्रायकर ऑफ द सीझन
या हंगामाचा स्ट्रायकर ऑफ द सीझन पुरस्कार 22 वर्षीय दिल्ली कॅपिटल्सचा दमदार फलंदाज जेक फ्रेझर मॅकगर्कला देण्यात आला. मॅकगर्कने या हंगामात मध्ये नऊ सामन्यांमध्ये 234 स्ट्राईक रेटने 330 धावा केल्या यासाठी त्याला बक्षिस म्हणून दहा लाख रुपये मिळाले.
फॅन्टसी प्लेयर ऑफ द सीझन
या हंगामात फॅन्टसी प्लेयर ऑफ द सीझन पुरस्काराचा मानकरी सुनील नरेन ठरला, त्यासाठी त्याला बक्षीस म्हणून दहा लाख रुपये मिळाले. गोलंदाजीसोबतच नरेनने या हंगामात फलंदाजीतसुद्धा दमदार कामगिरी केली.
सुपर सिक्स ऑफ द सीझन
हैदराबादच्या सलामीवीर अभिषेक शर्माने आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक षटकार ठोकले आणि त्यामुळे या पुरस्काराचा मानकरी तो ठरला. त्याने या हंगामात 42 षटकार मारले आणि त्यासाठी त्याला बक्षीस म्हणून दहा लाख रुपये मिळाले.
ऑन द गो फोर्स ऑफ द सीझन
हैदराबादच्या ट्रॅव्हिस हेडला या हंगामात सर्वाधिक चौकार मारल्याबद्दल ऑन द गो फोर्स ऑफ द सीझन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या हंगामात त्याने एकूण 64 चौकार मारले आणि त्यासाठी त्याला बक्षीस म्हणून दहा लाख रुपये मिळाले.
कॅच ऑफ द सीझन
कोलकत्ता विरुद्ध लखनौच्या सामन्यात कोलकात्ताच्या रमणदीपने अर्शिन कुलकर्णीचा आवाक्याबाहेरचा झेल घेतल्यामुळे त्याला या हंगामाचा कॅच ऑफ द सीझनचा पुरस्कार आणि दहा लाख रुपये बक्षिस म्हणून मिळाले.
मोस्ट वैल्युएबल प्लेयर
आयपीएल 2024 मधला मोस्ट वैल्युएबल प्लेयर हा सुनील नरेन ठरला. या हंगामात त्याने फलंदाजी करत 488 धावा केल्या तर गोलंदाजीत 17 बळी घेतले. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला या पुरस्काराचा मानकरी तो ठरला आणि दहा लाख रुपये बक्षिस म्हणून मिळाले.
Exit mobile version