सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव
। मुंबई । वृत्तसंस्था ।
आयपीएल 2024 हंगामाच्या अंतिम सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघ आमनेसामने होते. एकतर्फा झालेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 8 विकेट्सने शानदार विजय मिळवत आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. तर सनरायजर्स हैदराबादला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विजेता ठरली आहे. या सामन्याचे आयोजन हे चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले होते. कोलकाता नाईट रायडर्सने महाअंतिम सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. केकेआरने या विजयासह ट्रॉफी जिंकली. केकेआरने या याधी 2012 आणि 2014 साली गौतम गंभीर याच्या नेतृत्वात ट्रॉफीवर नाव कोरले होते.