। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल लवकरच भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. त्याची श्रीलंकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. भारतीय संघाला 27 जुलैपासून श्रीलंका दौर्यात 3 सामन्यांची टी-20 आणि 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. मात्र, केएल राहुलला टी-20 मालिकेसाठी संधी देण्यात आलेली नाही. मात्र, एकदिवसीय संघातील तो प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. दरम्यान, 2 ऑगस्टपासून सुरू होणार्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी त्याने नेटमध्ये जोरदार सराव केला आहे. त्याने नेटमध्ये फलंदाजीचा सराव करतानाचा एक 14 सेंकदाचा व्हिडिओ सोशल माडियावर शेअर केला आहे. त्यामुळे आता त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे..