| नवी मुंबई | वृत्तसंस्था |
केएल राहुलसाठी आयपीएल 2024 चा हंगाम काही खास राहिला नव्हता. महत्त्वाचे म्हणजे, हैदराबादविरुद्धच्या सामन्यात लखनऊचा 10 गडी राखून पराभव झाल्यानंतर संघमालक संजीव गोयंका यांचा राहुलशी वाद झाला होता. आता आयपीएल 2025 पूर्वी कर्नाटकच्या या स्टार फलंदाजाने स्पर्धेतील काही नकारात्मक बाबींवरून पडदा उघडला आहे.
आयपीएल मधील संघांचे मालक व्यावसायिक पार्श्वभूमीचे आहेत आणि ते रिसर्च करून टीम निवडतात. संघ मालक व्यावसायिक पार्श्वभूमीतून येतात. ते रिसर्च करतात आणि संघ निवडतात. परंतु तुम्ही प्रत्येक सामना जिंकू शकाल याची खात्री नसते. डेटानुसार तुम्हाला सर्वोत्तम खेळाडू मिळू शकतात, परंतु त्यांचे वर्ष खराब असू शकते. खेळात प्रत्येक खेळाडूचा वाईट दिवस येऊ शकतो. आयपीएल 2025 पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, जर राहुलनं लखनऊची साथ सोडली, तर तो त्याची जुनी फ्रँचायझी म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये परत येऊ शकतो. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.