| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहरातील वडाळे तलाव परिसरात डिपॉझिट परत देण्याच्या वादातून चाकूने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला असून, पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.
मळािलेल्या माहितीनुसार, आनंद जाधव यांनी 2 लाख रुपये ठेवी डिपॉझीटवर गोविंद राठोड यांच्या भावाच्या नावावर असलेली सदनिका भाडे तत्त्वावर घेतली होती. दरम्यान, आनंद जाधव यांचे सोसायटीमधील सदस्यांशी वाद झाल्याने त्यांनी गोविंद राठोड यांच्याकडे डिपॉझीटचे पैसे परत मागीतले. हे पैसे देण्यासाठी गोविंद राठोड हे वडाळे तलाव परिसरामध्ये गेले. त्यावेळी आनंद जाधव यांनी, माझे पुर्ण पैसे मला परत कर, असे बोलुन गोविंद रोठोड यांची कॉलर पकडुन त्यांना शिवीगाळ केली. हा वाद वाढत गेला आणि आनंद जाधव यांनी आपल्याजवळील चाकु गोविंद राठोड यांच्या पोटामध्ये खुपसुन गंभीर जखमी केले. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात आनंद जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







