| नाशिक | वृत्तसंस्था |
नाशिकमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अर्थात एएसआय नामदेव सोनवणे या ज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यावर एका टोळक्याने भर रस्त्यात चाकूने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या एका टोळक्याला सोनावणे यांनी हटकल्याने या टोळक्यातील एकाने भर रस्त्यात त्यांच्यावर चाकूने वार केला. या हल्ल्यात सोनवणे जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे आपल्यावर हल्ला झालेला असतानाही एएसआय सोनावणे यांनी या हल्लेखोरांना पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पंचवटी पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.