उधारी परत न केल्याच्या रागातून चाकू हल्ला

। पनवेल । प्रतिनिधी ।

उधारीचे पैसे परत न दिल्याने चाकूने वार केल्याची घटना तळोजा परिसरात घडली. या प्रकरणी नुमान अंसारी, रा. दुर्वांकुर सोसायटी फेस टू तळोजा नावाच्या व्यक्तीविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहबूब शेख हा तळोजा घोट कॅम्प येथे राहत असून, त्यांचा मित्र नुमान अन्सारी यांच्यात नेहमी पैशांची देवाण-घेवाण होत असते. दीड महिन्यापूर्वी नुमान कडून शेख याने वीस हजार रुपये घेतलेले होते व त्यातील 11 हजार रुपये देणे बाकी होते. नुमान याने शेख याच्याकडे उधार दिलेले पैसे परत मागितले. यावेळी चार दिवस थांब, पैसे परत करतो असे शेख बोलला असता, दोघांमध्ये वाद झाला आणि नुमान याने आपल्याकडील चाकूने शेख याच्या डोक्यात वार केल्याने तो जखमी झाला आहे.

Exit mobile version