पंचालाच हाणला नॉक आऊट ‘पंच’

तुर्की फुटबॉल लीगमधील धक्कादायक प्रकार

| तुर्की | वृत्तसंस्था |

तुर्की फुटबॉल लीगमध्ये एक एजब आणि धक्कादायक प्रकार घडला. अंकारागुजू फुटबॉल क्लबचे अध्यक्ष फारकू कोका यांनी पंचांच्या चेहऱ्यावर जोरदार ठोसा लगावला. या ठोशामुळे पंच जमिनीवर कोसळले. ही घटाना अकारागुजू विरूद्ध रिझेस्पोर या सामन्यादरम्यान घडली. हा सामना 1 – 1 असा बरोबरीत सुटला. पंच हलिल यांनी 96 व्या मिनिटाला कायकूर रिझेसपोरने अंकारागुजूवर गोल केला. याचबरोबर सामना 1 – 1 असा बरोबरीत सुटला. त्यानंतर अंकारागुजूचे अध्यक्ष फारकू हे तावातावाने मैदानात आले अन्‌‍ त्यांनी पंच हलिल यांना ठोसाच लगावला.

अंकारागुजूचे चाहते देखील मैदानात शिरले होते. हलिल हे मैदानावर कोसळले असताना त्यांना लाथा देखील मारल्या गेल्या. अखेर पोलिसांच्या मदतीने पंच हलिल यांना कपडे बदलण्याच्या खोलीपर्यंत नेले. तुर्कीच्या फुटबॉल फेडरेशनने यानंतर ट्विट केलं की, ‘तुक्रीच्या फुटबॉल फेडरेशनने या घटनेनंतर लीगमधील सर्व सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. संबधीत क्लब, क्लबचे संचालक, अधिकारी आणि पंचाना मारहाणीत जे कोणी दोषी आहेत त्यांना अत्यंत कडक शिक्षा करण्यात येणार आहे.

Exit mobile version