| माणगाव | प्रतिनिधी |
तालुक्यातील निजामपूर जवळील भाले गावच्या हद्दीत कोलाड- भाले एसटी बस पलटी झाल्याची घटना सोमवारी (दि.15) घडली. भाले वरून कोलाडच्या दिशेने जाणारी बस सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भाले गावाजवळ आली असता बसचा अपघात झाला. बस रस्त्याच्या एका बाजूला जाऊन पलटी झाली. या बसमध्ये एकूण आठ प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये शाळकरी विद्यार्थी देखील होते. सुदैवाने कोणासही दुखापत झालेली नाही. समोरून अचानक स्कॉर्पिओ गाडी आल्याने व रस्ता अरुंद असल्याने बस रस्त्याचे खाली जावून पलटी झाली. यावेळी या मार्गाने काही सामाजिक कार्यकर्ते प्रवास करीत असताना त्याच्या निदर्शनास आल्यावेळी त्यांनी तात्काळ बस मधील प्रवाशांना बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले.







