गोवे खांब प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धा

कोलाड किंग गोवे संघ अंतिम विजेता

| कोलाड | वार्ताहर |

गोवे खांब ग्रामीण क्रिकेट असोशिएनच्या मान्यतेने गोवे खांब प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शनिवार (दि.9) मार्च ते रविवार (दि.10) मार्च 2024 पर्यंत आयोजन करण्यात आले. या क्रिकेट सामन्यातील अंतिम सामना संघमालक भिमराज कापसे व वैभव पालकर यांचा कोलाड किंग गोवे व संघमालक योगेश बामुगडे यांचा शिवम फायटर किल्ला संघ यांच्यात झाला शेवटच्या चेंडू पर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात कोलाड किंग गोवे क्रिकेट संघ अंतिम विजेता संघ ठरला. शिवम फायटर किल्ला संघाला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले.

या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन कोलाड विभागीय अध्यक्षा सुप्रिया जाधव, गोवे ग्रामपंचायत सदस्य नितीन जाधव, निशा जवके,संदिप जाधव, गाव समिती अध्यक्ष नामदेव जाधव, महेंद्र जाधव, पांडुरंग जाधव, रामचंद्र कापसे यांच्या हस्ते करण्यात आले.

या क्रिकेट स्पर्धेत स्वराज दळवी मालिकावीर, मनिष पवार उत्कृष्ट फलंदाज, नागेश मुंडे उत्कृष्ट गोलंदाज, पार्थ कापसे यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यावेळी गोवे ग्रामपंचायत सदस्य नितीन जाधव, मनोहर मांजरे, शांताराम पवार, रामा गुजर, लिलाधर दहिंबेकर, पांडुरंग जाधव, रामचंद्र कापसे, नंदा वाफिळकर, अनिल दहिंबेकर, अविनाश आंबेकर यांच्या हस्ते विजेत्या संघाना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे समलोचन हर्षल मुंडे व मानव कडव यांनी केले.

सर्व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गोवे खांब ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, उपाध्यक्ष गणेश टवले, सचिव शरद वारकर, खजिनदार रोशन पवार, शिरीष दळवी, अंकित खैरे, रोहन भोसले, प्रज्योत जाधव, शैलेश कापसे, सुरज शिंदे, नितेश मुंडे, निरज महाडिक व सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version