कोलाड पोलिसांची गरजूला मदत


आदिवासी महिलेला दोन बकर्‍यांसह आर्थिक मदत
। कोलाड । वार्ताहर ।
रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी, कोलाड पोलीस अधिकारी तसेच सुदर्शन कंपनी धाटाव यांच्या माध्यमातून कोलाड येथील आदिवासी महिलेला शुक्रवारी दि.11 जून रोजी दोन बकर्‍या देऊन आर्थिक स्वरूपात केली मदत केली आहे.

कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोलाड आदिवासीवाडी येथील महिला सुगंधा आकाश जाधव यांचे पती आकाश जाधव हे पाण्यात बुडून मयत झाले होते. घरात एकटे कमवते असल्याने कुटुंबाचे होणारे हाल व घरात दोन लहान मुले यांची होणारी उपासमारी लक्षात घेता त्यांची उपजीविका भागविण्यासाठी रोहा विभागाचे एसडीपीओ सूर्यवंशी व कोलाड सपोनि सुभाष जाधव कोलाड तसेच सुदर्शन कंपनी धाटाव यांच्या प्रयत्नातून या महिलेला दोन बकर्‍या व मानधन देऊन आर्थिक मदत केली आहे. यावेळी रोहा उपविभागीय अधिकारी, कोलाड पोलीस अधिकारी व सुदर्शन कंपनी धाटावचे अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version