। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाराष्ट्र पेन्शनर अससोसिएशन द्वारा सन 2022 ते 2025 या तीन वर्षासाठी नुकताच निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला. त्यात राज्य स्तरावर काम करण्यासाठी राज्य कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून या वेळेस कोकण विभागातून राज्य स्तरावर रायगड जिल्हाचे विद्यमान अध्यक्ष धुरंदर श्रीराम मढवी मु. पेण यांची एकमताने निवड करण्यात आली. धुरंदर मढवी यांची कामाचा उरक पहाता व सेवानिवृतांच्या समस्यांना सतत न्याय दिल्याने त्यांची कोकण विभागीय उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. मढवी यांनी पेन्शनच्या टेबलवर काम केलेल असल्याने संघटनेचे काम करताना त्यांना या अनुभवाचा मोठा लाभ झाला आहे. मढवी हे एक अभ्यासू व कर्तबगार अध्यक्ष म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या निवडीमुळे रायगड मधील सेवानिवृतांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल अलिबाग तालुका अध्यक्षसुधीर पाटील, सदानंद पाटील, द.र.मोकल, सु.पाटील, राम म्हात्रे इत्यादी जिल्हा सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या निवडीचे अधिकृत पत्र निवडणूक निणर्य अधिकारी महाराष्ट्र पेन्शनर अससोसिएशन सदाशिव पेठ पुणे यांनी त्यांना दिले आहे.







