। गुहागर । वृत्तसंस्था ।
कोकण हेरिटेज राईडचे आयोजन केले होते. या उपक्रमांतर्गत विविध राज्यातील 60 विंटेज दुचाकीस्वार दोन दिवस गुहागरात पर्यटनासाठी आले होते. या निमित्ताने गुहागरकरांना जावा, एजडीई, जुन्या बुलेट या विंटेज बाईक पाहता आल्या.
कोकणातील निसर्गसौंदर्य, येथील जनजीवन, वास्तूकला, परंपरा विविध राज्यात पोचावी म्हणून कोकण हेरिटेज राईड हा उपक्रम येथील शांताई रिसॉर्टचे संचालक सिद्धेश खानविलकर आणि प्रवीण रणपिसे यांनी आयोजित केला होता. यामध्ये सहभागी झालेल्या पर्यटकांना अडूर बुधल गावातील डोंगरावर असलेले दुर्गादेवी मंदिर, गुहागरमधील 106 वर्ष जुने कोकणातील घर, समुद्रकिनारा, व्याडेश्वर मंदिर आदी स्थळे दाखवण्यात आली. हे सर्व वैभव पाहिल्यावर पर्यटक निहायत खूश झाले.
या राईडचे वैशिष्ट्य म्हणजे रॅलीत 50 वर्षांपूर्वी लोकप्रिय असलेल्या जावा एसडी, बुलेट यांचा समावेश होता. सर्वात जुनी गाडी 1962 मधील होती. एक गाडी 1970 मध्ये झेकोस्लोवाकिया देशातून आयात केलेली दुचाकी होती. रॉयल एनफिल्ड कंपनीचे पहिले बुलेट मॉडेलही होते. त्यामुळे गुहागरमधील वाहनप्रेमींना जुन्या गाड्या पाहण्याची संधी मिळाली.