| कोर्लई | प्रतिनिधी |
कोकण मराठी साहित्य परिषदेचे रायगड जिल्हा अध्यक्ष, प्रियदर्शनी फाऊंडेशनतर्फे संजय पांडुरंग गुंजाळ यांना रायगड सांस्कृतिक कला मंडळ, महाराष्ट्र राज्य रजि.चा कोकण रत्न पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे. माणगाव येथील मुंबई-गोवा हायवे लगत एचपी पेट्रोल पंपनजीकच्या गांधी मैदानात शुक्रवारी (दि.12) सांय 6 वा. रायगड सांस्कृतिक कला मंडळाच्या कोकण फेस्टिवल- 2025 कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत संजय गुंजाळ यांना कोकण रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मागील वर्षी सर्वद फाउंडेशनच्या कार्यक्रमात संजय गुंजाळ यांना जीवन गौरव पुरस्कार -2025 प्रदान करण्यात आला आहे. कला, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील संजय गुंजाळ यांचे कार्य उल्लेखनीय असून गेली वर्षे कलासागर नाट्य संस्थेचे अध्यक्ष म्हणून यशस्वी धुरा सांभाळली आहे. सन 2011 चा ‘ॐ नम:शिवाय प्रतिष्ठान’चा ‘बाळशास्त्री जांभेकर’ हा राज्यस्तरीय पुरस्कार, सन 2010चा रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाऊंडेशनचा ‘सांस्कृतिक व कला पुरस्कार’ मिळाला आहे. शहरातील हिंदू-मुस्लीम ऐक्य राखण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.







