पनवेल | विशेष प्रतिनिधी |
जय हनुमान क्रिकेट संघ खारघर यांनी रविवारी टेनिस क्रिकेटचे सामने आयोजित केले होते. या सामान्यात प्रथम क्रमांक 40 हजार व चषक शनी कृपा क्रिकेट संघ कोपरा यांनी पटकावला. तर दुतीय क्रमांक 20 हजार रुपये आणि चषक सीआयएफ कॉलनी संघ तळोजे यांनी पटकावले. दुर्गेश ठाकुर हे सामन्याचे मालिकावीर ठरले तर आदिल शेख सामन्याचे उत्कृष्ट फलंदाज व जितू ठाकूर सामन्याचे उत्कृष्ट गोलंदाज ठरले.