रेवदंड्यात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
| रेवदंडा | वार्ताहर |
प्रतिवर्षाप्रमाणे कोर्लई ते एकविरा पालखीसह पदयात्रेचा प्रारंभ दिमाखदारपणे झाला. या पालखीसह पदयात्रेचे नियोजन साई सेवक एकविरा मंडळ, कोर्लई यांनी केले आहे.
कोर्लई दत्त मंदिर येथून कोर्लई ते एकविरा पालखीस पदयात्रेचा प्रारंभ सकाळी नऊ वाजता झाला. यावेळी कोर्लई ग्रामस्थ व महिला यांनी मोठ्या भक्तीभावाने पालखीचे दर्शन घेतले. ही पालखी बुधवार (दि.16) कार्ला येथे प्रस्थान करणार आहे.
या पालखीसह पदयात्रेचे नियोजन सायन-मुंबई शिवसेना शाखा प्रमुख, मुरूड तालुका शिवसेना संपर्कप्रमुख संस्थापक गजानन पाटील यांनी केले आहे. त्याचबरोबर साई सेवक एकविरा मंडळ अध्यक्ष अभय पाटील, उपाध्यक्ष मारूती पाटील, खजिनदार जितेंद्र पाटील, सहखजिनदार राजू आग्रावकर हे किशोर गजानन पाटील यांच्या सौजन्याने परिश्रम घेत आहेत. यासाठी मनोहर कोटकर, संजय बळकवडे, संतोष बलकवडे, दयानंद कनगी, राजन बलकवडे, राजन पाटील,चंद्रकांत भाटे, अमोल पाटील, विवेक पाटील, महेश पाटील, विवेक बलकवडे, पवन भोईर, निलेश पाटील, वसंत सोडेकर, सोमनाथ भोबर, महेश पाटील, संदेश पैतरी, राजन पाटील, आदीचे सहकार्य मिळत आहे.
कोर्लई ते एकविरा पालखीसह पदयात्रेचे हे 14 वे वर्ष आहे. कोर्लई दत्त मंदिर येथे शनिवार (दि.19) सांगता समारंभ आयोजित करण्यता आला असून, यानिमित्त सायंकाळी सहा वाजता महापूजा व महाप्रसाद तसेच सात वाजता सांगता समारंभ व मान्यवरांचे सत्कार कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.