राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत कोशिक ठाकूर यांचा दुसरा क्रमांक


। उरण । वार्ताहर ।
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारडे येथील उपक्रमशील शिक्षक कौशिक ठाकूर यांनी 2021-22 या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत माझे अंगण माझी शाळा या नवोपक्रमाला रायगड जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळाला आहे. या अगोदर ही शैक्षणिक गरज 2019-20 मध्ये शालेय संग्रहालय या उपक्रमाला तिसरा व 2020-21मध्ये तळ्याच्या फांजीवर या उपक्रमाला चौथा क्रमांक होता. सतत तीन वर्ष सर्वोत्तम पाच येण्याचा मान मिळविणारे ते पहिले रायगड जिल्ह्यातील पाहिले शिक्षक ठरले आहेत. जिल्हा शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या चंद्रकला ठोके, ज्येष्ठ अधिव्याख्याते सागर तुपे, अधिव्याख्याते संतोष दौड यांच्या हस्ते अभिनंदन करून गौरविण्यात आले. त्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Exit mobile version